Monday, September 27, 2010

माझ्यातला मी ..

आज शनिवार ..Office relax होत.. म्हणजे लेट गेला तरी चालणार होता .. रात्रभरच्या विचाराने मन आणि डोकं जड झालेला होता .. शोवर खाली उभा राहून आयुष्याचा विचार करू लागलो..क्षणात भर भर करत आयुष्य सबंध आयुष्य एखाद्या भरभरणाऱ्या पाखरासारखा उडून गेलं...

पहिला वाढदिवस..शाळेचा पहिला दिवस..निसर्गात मित्रांसोबत
काढलेल्या ट्रिप्स ..केलेला एन्जोय ..पहिला पगार..
पहिला किस.. मित्रांसोबत केलेली मजा..आईला आणि बाबांना पहिल्या पगारातून केलेली shopping ..

सगळा काही एखाद्या movie सरकत जावा तसं डोळ्यासमोर तरळून गेलं..

पण शेवटी एकाच लक्षात आला..ह्या आठवणींमध्ये असलेला मी..आणि आजचा मी ह्यात खूप फरक जाणवला..सध्याचा असलेला "मी"..मीच आहे पण तरीही आजचा मी "तो मी नव्हेच" असा आहे हि भावना मनात घर करून गेली..
लहानपणी चार आणे मिळून खुश असलेला मी आज कितीतरी पट मिळूनही खरच खुश आहे का? काळाचा मी आजचा आयुष्य जगताना बदलला आहे एवढा मात्र खंर..कदाचित मला नक्की काय म्हणायचं आहे हे शब्दात मांडायला जमत नसेल मला .. पण नक्कीच सगळ बदलल आहे .. आज माझ्याकडे सर्व गोष्टी असताना माझ्यातला मी आज मला सापडत नाही आहे ..आणि तो सापडायला आज मला वेळ पण देता येत नाही आहे..

लहानपणी वाटायचे मोठा झाल्यावर मी हे करीन..ते करीन मनात खूप सारया आशा होत्या.. आकांक्षा होत्या.. पण खरच खंर पहिला तर त्यापैकी आज मी काही एक करत नाही आहे..आणि किंबहुना काही करूच शकत नाही आहे ..सगळ्यांसाठी आयुष्य जगताना..सांभाळताना माझ्यातल्या मी ला..मी कुठेतरी दडपून ठेवले आहे ..आयुष्याकडून मिळणारे सुख, दुःख ,frustrations अनुभवताना /त्यांच्याशी झगडताना माझ्यातल्या मी ला जे करावेसे वाटत आहे त्याच्यासाठी माझ्या जवळ वेळच नाही आहे..

प्रत्येक वेळी आयष्य एक वेगळाच वळण घेतं..चांगल असो किवा वाईट ..पण आय्श्याच्या वाटेवर.. प्रत्येक वळणावर मला काहीतरी भेटते मी खुश होतो..पण समजते जे आपल्याला हवे आहे ते हे नाहीच ...विचार करतो.."थांब.....थोडा वेळ थांब..तुझ्या ज्या आयुष्याकडून अपेक्षा आहेत..त्या होतु पूर्ण ".....पण कधी?? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुन्हा धावतो..जगण्याच्या ह्या RAT-RACE मध्ये नुसता धावतोच आहे. किंबहुना ढकलला जातो आहे..धावता धावता ........दमतो..थकतो.."पण कधी??" ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मला मिळालेले नसते..जेव्हा कडेला बघतो . तेव्हा जाणवते आपण फार काही पुढे गेलेलो नाही..पण आपल्या बाजूने दिसणारे ..धावणारे जग भराभरा धावताना दिसते..प्रत्येक वळणावर पुढे काय दिसते ? काय मिळते ? मी हेच पाहत राहतो..तिथे त्या पलीकडे ..ज्याला आपण क्षितीज म्हणतो तिथेच माझ्या मनातले स्वप्ना मला मिळणार आणि मला माझा मी सापडणार..आणि माझी स्वप्न सत्यात उतरतील आणि म्हणून क्षितीज पकडण्यासाठी मी पुन्हा धावायला लागतो..पण मला एकाच विश्वास आहे ..मी क्षितिजाला पार करणारच व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवणारच..

अर्थात मी निराश नक्कीच नाही ..माझ्या आयुष्याबद्दल मला तक्रार तर अजिबात नाही.. मला जे आयुष्याकडून मिळाले ते भरभरून मिळाले, आणि जे मिळत आहे ते भरभरून मिळत आहे..पण माझ्यातला मी कुठेतरी राहून चालला आहे ह्याची हुरहूर मनाशी कुठेतरी आहे..

मी आयुष्याचा अथांग समुद्र अनुभवला..माझ्या पायाशी येणाऱ्या सुखाच्या आणि दुखाच्या लाटा अनुभवल्या ... त्यांचे खडकावरून उडणारे पाण्याचे तुषार अंगावरून झेलले ..आयुष्याचा समुद्रात रंगबेरंगी शंख व शिंपले जमवले...असे खूप सारे शिंपले सापडले ज्यात मला नेहमी साथ देणारे मित्रांसारखे मोती सापडले..ते मोती मी माझ्या हृद्यापाशी जपून ठेवले आहेत..नेहमी साठी देणारा बायको रुपी मोती सापडला..तोही मी जपून ठेवणारच..पण तरीही असा एक शिंपला ज्यात माझ्या स्वप्नांचा मोती दडून बसलेला आहे तो मला काही केल्या मिळताच नाही आहे..

मी शांत असतो पण मनात खोलवर कुठेतरी..scheduled task प्रमाणे प्रश्न आणि उत्तरांचा खेळ चालूच असतो..असा केला तर? हे करून पाहिलं तर? ..तसं करून पाहिलं तर? पण नुसतेच प्रश्न असतात ..आणि त्यांचे पर्याय असतात ..मीच प्रश्नांचा पर्याय निवडतो..आणि मनातला माझा होस्ट मला विचारतो लॉक करू?... मी पुन्हा स्तब्ध होऊन जातो..आणि पर्यायावरून नजर फिरवतो पण eकाही केल्या पर्यायचनिवडता येत नाही ..आणि शेवटी मीच लॉक होऊन जातो ..

मला माझ्या आयुष्याकडून अजून बऱ्याच अपेक्षा आहेत ..व मी पाहिलेले स्वप्न पूर्ण होतीलच .. कारण मी जे काही करू शकतो ते करणारच पण आता सध्या तरी वाहत्या पाण्यात काडी बनून वाहत जाणेच माझ्या हातात आहे..कारण प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हि वेळ नक्कीच नाही...
पोस्ट लिहिता लिहिता लक्षात आलं मी चक्क blog लिहायला लागलो ...असा काही लिहिण्याची अपेक्षा मला कधीच नव्हती..चला अंगावर आनंदाचा आणखी एक थेंब पडला..त्यात चिंब भिजून घेऊया...

Wednesday, August 4, 2010

आरंभ..

आकाशात काळे ढग जमायला लागले कि का कुणास ठाऊक माझ्या मनात अनामिक अशी एक भीती आणि हुरहूर निर्माण होऊन जाते..माझं हे असाच असत हुरहूर कशाची आणि भीती कशामुळे मला आजपर्यंत कधीच समजलेलं नाही... असो..
काळे ढग येतात ..सोसाट्याचा वारा सुटतो ..विजा कडाडता ..सुरुवातीचे चार थेंब पडतात .. आणि मातीचा सुगंध दरवळायला लागतो..पण चार थेंब टाकून ढग तसेच निघून जातात..आणि आपण त्या ढगांकडे सुक्या सुक्या नजरेने बघत राहतो.. कोरडेच ढग ते त्यांना ओलावा काय कळणार..

माझं सुद्धा असच होत, मनात विचारांचा वारा सोसाट्याने वाहू लागतो .. कोरड्या विचारांच्याच विजा कडकडायला लागतात ..आणि मनात एक अनामिक आशी भीती आणि हुरहूर निर्माण करून जातात..अस का होत?? आज पर्यंत मला कधीही समजलेला नाही...

आज मात्र पाऊस बेभान होऊन बरसतो आहे ..फुला पानांवर थेंब होऊन पसरतो आहे ..काळ्या डांबरी रस्त्यावर थयथयाट करून नाचतो आहे..ओढ्या नाल्यांमध्ये अवखळ पणे वाहतो आहे..
पावसाला पाहून आज मी हि ठरवलं आज आपण हि बरसायचं ..लिहिलेले शब्द थेंबा थेंबा ने वाढवायचे आणि त्यांचा ओढ्यात झालेला रुपांतर बघत राहायचा ..मनाच्या पडद्याला थोडा वेळ बंद करून जे काही सूर निघतील त्यांना कागदावर उतरावयाच..
कालचे कोरडे ढग आज ओले झाले आणि स्वताच्या उमेदीवर बरसून सर्व वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करून गेले ..
काळ परवापर्यंत पावसाचं काहीच अस्तित्व नव्हत आणि आज सगळीकडे फक्त तो आणि तोच आहे.. माझ्याही आयुष्यात असाच काही आहे..काल माझं काहीच अस्तित्व नव्हतं, आज सुद्धा अगदी ते नावालाच आहे पण असं जरी असलं तरी उद्याच्या दिवसावर फक्त माझंच नाव कोरायचंय.. ह्याला फक्त तुझी आणि फक्त तुझीच साथ हवी आहे...
समोरचा तो डोंगरमाथा काल उघडाबंब होता, आज मात्र पावसाच्या अस्तित्वाने तो स्वताचं हिरवं रुपडं सगळ्या जगाला नटवून सांगत फिरतोय...माझाही अस्तित्व कुणीतरी नवलाईने नटवून कुणालातरी सांगेल ह्याची मला खात्री आहे....

तळपणारया सुर्याला झेलताना धरणी फाटली तरी पावसाची वाट पाहताना ती कधी थकत नाही, ढग इथे येतात तेव्हा ते कधी हजारो मैलांचा विचार करत नाही, वाहणारी नदी कधी समोरच्या अडथळ्यांना घाबरत नाही, मग मी कशाला कुणाला घाबरू ?

पण मला फक्त तू आणि तूच सगळ्या परिस्थितीत साथ दे ..कारण हे तुझ्या शक्तीशिवाय कधी हि शक्य होणार नाही .......देवा, ऐक्तोयेस ना रे तू???















Tuesday, February 16, 2010

तो आणि ती (He & She)


आज ११ फेब्रु, पुन्हा तिच्या आठवणीने त्याचे मन दाटून आले. ऑफिस मध्ये मित्र -मैत्रिणीच्या आणि कामाच्या गराड्यात तो अडकलेला तरीही तो एकटा होता. मित्र -मैत्रिणी Valentine Day च्या गडबडीत होते, कुणाला तरी Surprise gift द्यायचे होते, तर कुणाला तरी आपल्या नवऱ्याला इम्प्रेस करायचे होते.ह्या सर्व गडबड गोंधळातही तो एकटा होता ..शांत होता .. सर्व काही ओल्या डोळ्यांनी बघत होता, पण आतून बोचणार्या भावना त्याचे लक्ष कशातच लागू देत नव्हत्या.तो एवढ्या गोंधळात राहूनही एकटा होता.

त्याला कारणही तसाच होत,आजपासून बरोबर ३ वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात ती आली होती.

तो : सर्वांमध्ये लाडका असणारा,सर्वाना सांभाळणारा,सर्वांची काळजी करणारा,सर्वाना काळजीने विचारणारा असा तो.सगळ्या गोष्टी passionate पणे करणारा.. स्वताच कॅरिअर साभाळनारा ...सगळ्या गोष्टी करायला एका पायावर तय्यार..आणि ह्याचा हो असणारच असाच सगळे मानायचे..घरापासून लांब पण कधी कुणापासून दूर नाही गेला... असा तो ...

आयुष्यात आपण कधी प्रेम वैगेरे काही करू हि कल्पना त्याच्या डोक्यात कधी आलीच नाही कारण त्याला माहित होता कि प्रेम वैगेरे जर आपण केलाच तर ते इतका passionately करू कि त्याला कुठलाही बंध राहणार नाही आणि त्याला आयुष्यात बंधन हि होतीच...
Dil Chahata hai हा आवडता movie त्यात आमीर ला नाही म्हणता म्हणता प्रेम झालं... आपल्यालाहि असा काही होईल असा विचार त्याच्या मनाला कधी हि शिवला नाही..

ती :
स्वताच्या कॅर्रीर मध्ये गुंग असणारी ..सर्वाना समजून घेणारी..स्वताच्या आयुष्यात किती सारे प्रोब्लेम्स होते पण ते प्रोब्लेम्स कधीही कुणाला न सांगणारी.. कधीही स्वताहून discuss न करणारी .. Happy GO lucky अशी ती..
प्रेम कशाबरोबर खातात हे तिलाही माहित नव्हत..पण आयुष्यात सगळ्या गोष्टी अनुभवायच्या हा तिला भारी छंद. दारू पियुन माणूस काय फील करतो हेय तिला practically अनुभवायचा होता असा विचार करणारी ती..

soft minded .. इतकी कि जगात दुखी मानस का आहेत व त्यांचा दुख आपण कसा कमी करू शकतो हा विचार करणारी ..स्वतःच दुख लपवता लपवता आणि आपला आयुष्य solve करता करता जगणारी अशी ती ..


१४ फेब्रुवारी .. आज पासून बरोबर २ वर्षापूर्वी त्याला तिचा फोने आला नेहमीप्रमाणे तिने त्याच्याशी गप्पा मारल्या .. पण आज असा का होत होता कि ती त्याच्याशी सगळ्या गोष्टी share करत होती ज्या गोष्टी तिने त्याला कधीच सांगितल्या नव्हत्या .. त्या गोष्टी ऐकून त्याला अतीव दुःख झाले..त्याला हि गोष्ट समजताच नव्हती कि इतकी चांगली असणारी ती .. तिच्या आयुष्यात असा काही असाव आणि तिच्या आयुष्यात असा
दुः ख का असावा हे त्याला मान्यच नव्हत..तिला ह्यातून बाहेर काढायचा आणि तिच्या जीवनाला नवीन अशा मिळवून द्यायची हा निर्धार त्याने मानाने केला..रोज तिच्याशी बोलून तो तिचा दुःख हलका करू लागला..तिने सतत हसावं . तिने ह्या सर्व अडचणीतून मार्ग काढावा हि त्याची इच्छा ..तो तिला ह्यासाठी लागेल ती मदत करू लागला.. तिला हि कुणाचा तरी आधार मिलाला म्हणून ती खुश होती.. असा सगळा एकदम सुरळीत चालला होता... असाच सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगू लागले ... आणि एक चांगले मित्र म्हणून जवळ येऊ लागले .. पण आपण प्रेमात पडलो आहोत का हि भावना तिच्या मनाला अजून तरी शिवली नव्हती..

पण तो ..कुणी एक मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि आपण तिच्या आयुष्यातला एक अविभाज्य अंग बनलो हि भावना त्याच्या मनाला खूप सुखावत होती..त्याचा अंतर्मन त्याला सांगत होता कि तू प्रेमात पडला आहेस .. पण त्याच्या बह्यामानाला ह्या गोष्टींचा थांगपत्ता पण लागत नव्हता म्हणून त्याचा बाह्यमन त्याला हि गोष्ट मान्यच करू देत नव्हत... आणि ह्या दोन्ही मनांच्या द्वंद्वा मध्ये तो अडकलेला होता ..

असच दोघा मधला अंतर मानाने कमी होत होता..असाच एक दिवस ते दोघेही एकमेकांना भेटले .. दोघे हि खुश होते.. आनंदाने एकेमेकांच्या हातात हात घालून फिरत होते आनंदाने गप्पा मारत होते.. कधी कधी ती त्याच्या इतक्या जवळ येत होती कि तिचे श्वास सुद्धा त्याला जाणवत होते ..त्या श्वासांनी आणि त्या स्पर्शाने तो बैचैन होत होता... अशी बैचैनीची भावना मनात का येत आहे ..ह्याचे उत्तर त्याला काही केल्या कळत नव्हती..पण एक भावना त्याच्या मनात दृढ झाली कि आपण प्रेमात पडलो आहोत......
पण तिच्या मनात कुठल्या भावना आहे त्याला काही केल्या कळत नव्हत्या ..तिचा तो अल्गाद्सा स्पर्श... आधारासाठी धरलेला हात ..पडण्याच्या भीतीने बिलगलेल्या हातांचा स्पर्श.. ह्या सर्व गोष्टी त्याचा मन विचाल्लीत करत होत्या..
काय करावा? कसा सांगाव? ह्या सर्व चिंतनी त्याचा मन ग्रासला होता..तिचा तो अवखळपण बघून हि आपल्याला चुकीचा समजेल का?? ह्याने त्याचा मन घाबरत होता...

परतीच्या प्रवासात दोघे जवळ जवळ बसलेले होते ... हातात हात होते...त्यांची नजर बर्याच गोष्टींचा वेध घेत होती...ती आपल्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत होती...हा तिला मी कायम सोबत असणार ह्याची ग्वाही देत होता...
आणि तिचे डोळे अचानक पाणावले ह्याने तिला समजावलं आणि शेवटी तिला रडण्यासाठी त्याच्या खांद्याचा आधार मिळाला.. त्याने समजावता समजावता आणि एकमेकांजवळ बसता बसता.. परतीचा प्रवास संपला..
त्या प्रवासात दोघांनीही एकही शब्दाने संवाद केला नव्हता पण त्यांच्या मानाने अखंड प्रवास करून संपूर्ण संवाद साधला होता..
उतरताना तिने दिलेला मंद हास्य बघून तोही हसत होता..ती नॉर्मल झालेली होती...तर्र पुन्हा आयुष्यात कधीही गरज पडली तर मी उभा असणार ह्या भावनेने तो हि हसत उभा होता..हेय करताना त्याने मिठी मारण्यासाठी आपला हात पुढे केला..तिनेहि मंदसा प्रतिसाद देऊन त्याच्या मिठीत ती सामावून गेली.. पुढे त्यांच्या नजरेनेच संवाद साधला.. आणि बघता बघता त्यांचे अंतर मानाने आणि शरीराने कमी झालेले होते..दोघे एकेमेकांना बघताना इतके गुंग झाले होते कि.. त्यांच्या ओठांनी एकमेकांना केंव्हा स्पर्श केला हे दोघानाही समजलेच नाही...!!!

Distance between them was so close that nobody knows who took the initiative.........

आज ह्या गोष्टीला खूप वर्ष झाली आहेत...दोघेही आपल्या आपल्या आयुष्यात खूप खुश आहेत...आणि आज त्यांच्या आयुष्यात त्यांनी जवळपास सगळ्या गोष्टी संपादन केल्या आहेत...आयुष्य जगताना ते एकमेकांच्या जवळ आले एक सुंदरसा आयुष्य जगलेत...

आज सुद्धा दोघे एकमेकांना भेटतात... एकमेकांशी गप्पा मारतात...आणि एकमेकांना समजून घेतात....
त्यांना पहिला तर संदीप खरे ने केलेल्या काव्यपंक्ती त्यांच्यासाठी एकदम समर्पक आहेत..

भेट जरी ह्या जन्मातून , ओळख झाली इतकी आतून..
प्रश्न मला जो पडला नाही, त्याचे हि तुज सुचते उत्तर ..
कितीक हळवे कितीक सुंदर,किती शहाणे आपले अंतर !!!

ते कोण होते?? ते एकत्र का नाही राहू शकले ?? ... ह्या सर्व गोष्टी त्यांना पहिला तर आज तरी एकदम न्यून वाटतात.....कारण कुणी तरी म्हटलंच आहे प्रेम म्हणजे मिळवण नव्हे तर एकमेकांसाठी केलेला त्याग असतो ..

तो आणि ती....