Thursday, July 23, 2015

हमसफ़र !!

हम बैठे हैं यहाँ, हमारे दुःखोंको गिनाते हुए ,
तू अकेले  कैसे जी रहा हैं वहा, जहा तेरे दुःख अनगिनत हैं ।

सलाम, हैं तुझे ये मेरे दोस्त !!

तू हर एक जिंदगी में चिराग जलाता गया,
हम वह भी ना कर पाए हातो मैं मशाल लेकर । 



Sunday, November 24, 2013

मैत्र ..


मैत्री ......रक्ताच्या नात्यानंतर आयुष्यातला सगळ्यात सुंदर नांत.. आई बाबा आजी आजोबा आणि मामा ह्यांच्यानंतर किंवा कधी कधी ह्यांच्या आधी जो कुणी असेल आणि सगळ्यात  जवळचा आणि सगळ्याच कडू गोड आठवणीत आणि अनुभवात साथ देणारा म्हणजे "मित्र"..

आयुष्यात जेव्हापासून मैत्री काय असते समाजत पण नव्हते तेव्हापासून असे काही मित्र जोडले गेले आहेत त्यांच्यामुळे आयुष्य खूप सुंदर बनलेले आहे..खरा मित्र कोण जो केव्हाहि हाक मारली तर कामाशिवाय आणि स्वार्थाशिवाय हाकेला "ओ" देणारा ..जो केवळ "जो तेरा हे वह मेरा हे" ह्यात धन्यता मानणारा नसतो तर "जो तेरा हे वह तेरा हे और जो मेरा हे वह भी तेरा हि हे " असा ठणकावून सांगणारा असतो ..

मैत्रीचा धागा इतका घट्ट असतो कि तो स्थळ, काळ,वेळ ह्याचा कधीही भान तो ठेवत नाही आणि कुठल हि संकट आला तरी तो तुटत नाही..ह्या धाग्याला जर आयष्यात योग्य प्रकारे गुंफल तर त्यातून सुंदर नाक्षिरूपी आयुष्य तयार होते ..त्यातला एक एक धागा सुंदर आणि स्वतःच अस्तित्व दाखविणारा आणि एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेला असतो ..
ह्या मैत्रीला कुठलाही बंधन नसत .. न वयाचं.. न स्त्री-पुरुष भेदाच..मैत्री हि कोणामध्ये हि होऊ शकते..आणि कुठ्ल्याहि वयात होऊ शकते .. माझ्या शेजारी राहणाऱ्या आजोबांना -काकांनाही मी मित्र बनवू शकतो आणि माझे विचार त्यांच्याशी शेअर करू शकतो ..

खरा मित्र कोण जो आयुष्यातल्या माझ्या चांगल्या निर्णयाच समर्थन करेल व त्या मागे खंबीर पणे उभा राहील आणि आईच्या नात्याने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करेल पण जर मी आयष्यात काही चुकीचा केल किंवा करत असेल तर बाबांच्या अधिकाराने आणि धाकाने त्या चुकीपासून परावृत्त करेल .. एवढी ताकद खरया मैत्रीमध्ये असते.. :)

खरी मैत्री हि सतत साथ देणारी असते ती स्थल-काल परत्वे बदलणारी नसते ..
खरी मैत्री कशी तर कृष्ण - अर्जुना सारखी  - जिथे प्रत्येक श्वासात मित्राचच नाव असत.. :)
खरी मैत्री कशी तर कृष्ण - सुदामा सारखी-जिथे प्रेमाने आणलेले पोहे सुद्धा अमृता सारखे लागतात .
खरी मैत्री कशी तर राम - सुग्रीवा सारखी-जिथे मित्रासाठी सारे ऐश्वर्य आणि सेना पणाला लावली जाते.

मित्र हे आयुष्याच्या संध्याकाळी बसलेले असताना आयुष्याकडे बघितले तर आयुष्यात चालताना  मिळालेले सुंदर रत्न असतात .. जे शेवट पर्यंत टिकतात ते आयुष्याला एक सुंदर झळाळी आणतात .. :)







Saturday, September 10, 2011

Dr. नावाचा देव..


आपल्या समाजात Dr. नावाला खूप सन्मान आहे, कारण असं म्हटलं जातं देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे Dr. यांचा..देव जसे कुणाचे प्राण घेऊ शकतो किंवा वाचवू शकतो तसे Dr सुद्धा कुणाचेही प्राण वाचवू शकतो
                         पूर्वी हा देव खूप दुर्मिळ असायचा, पाच ते दहा खेडेगाव किंवा संपूर्ण तालुका मिळून तो  एखादा दोनच असायचा म्हणजे त्यांचे दर्शन म्हणजे फारच दुर्मिळ असायचे आणि ते सुधा संपूर्ण  ऑल rounder असायचे, सगळी कामे ते स्वताच करायचे,Compounder पासून ते Dr पर्यंत सगळंच... पण आज  काल ह्या देवाचा स्वरूप फारच बदलेला आहे... तो आज आपल्याला गल्ली-गल्लीत आढळतो.... ह्या देवाला शोधायला आता फारसे कष्ट करावे नाही लागत.
                                                                      जो कुणी स्वस्थ आहे त्याला ह्या देवाची किंमत अजिबात कळत नाही पण ज्याला वाईट अनुभव येतो त्याला ह्या देवाची किमत मात्र खरच कळते आणि त्याचे महत्व सुद्धा..पण पूर्वी हा देव फार निस्वार्थी पणे काम करायचा ..आज  हे स्वरूप फार बदलले आहे..पण आज हि काही प्रामाणिक कर्तव्य करणारे देव आपल्या समाजात आहेत.
पूर्वी ह्या देवाचे स्वरूप फार वेगळे असायचे,तो एक टेबल-खुर्ची आणि एक तपासायचं बाकड कम बेड असलेल्या अशा मंदिरात आढळायचा ...पण आज काल ह्या देवाचे स्वरूप फार बदलेला आहे ....आज काल हा देव AC डीस्पेनसरी मध्ये एखाद्या कंपनीच्या CEO ला शोभेल अशा थाटात बसलेला असतो..आता खुर्ची कुशनवाली ..तपासायचा बाकड सोडून कुशनवाला hi-tech बेड ..अशा अलिशान मंदिरात आज काल हा देव आढळतो..

             असो पण ह्या वातावरणात त्यांच्याशी भेटण्याची तुम्हाला जबरदस्त फीस द्यावी लागते...असाच एकदा मी एका स्कीन स्पेशालीस्ट कडे गेलो होतो..तिथला अनुभव हा माझ्यासाठी फारच विलक्षण होता ..स्कीन स्पेशालीस्ट हा नामांकित होता ..म्हणजे जशी विठोबाच्या मंदिरात दर्शनसाठी रीघ लागावी तशी काहीतरी परिस्थिती तिथे होती..शेवटी Dr. हा देखील पृथ्वीतलावरील देवच आहे  तिथे पण दर्शनासाठी रीघ लागणे साहजिकच होते .. कारण हा देव देखील नामांकित ...मी जाताना एवढी गर्दी असणार हा विचार केलेलाच नव्हता..गेलो तर रेसिप्शन वरील बाई ने एकदम तुच्छतेने नाव विचारले..मी सांगितले ...तुछ्तेनेच लिहित तिने सांगितले  "तुमचा नंबर ९६ आहे..बसा तिकडे".. जशे देवाच्या ठिकाणी मंदिरात आत सोडणाऱ्याला सगळे जग तुच्छ वाटते .. कारण तो देवाच्या सगळ्यात जवळ असतो आणि देवाकडे बघणे त्याला नेहमीचच झालेला असतं.. आपण बिचारे देवाकडे श्रद्धा घेऊन जात असतो आणि तो आत सोडणारा आपल्याकडे एकदम त्रस्त होऊन बघत आपल्याला आत सोडत असतो.. असाच काहीसा प्रकार मला जाणवला.. असो आपली श्रद्धा आपण भेटायला आलेल्या देवासाठी ठेऊन मी मुकाट्याने समोर सांगितलेल्या बाकावर जाऊन बसलो ...
एक-एक नंबरत जात होता...आणि आत बसलेल्या देवाचा कृपा प्रसाद घेऊन बाहेर येत होता.. मला खूप असा कुतूहल होता कारण दवाखाना (मंदिर) बंद व्हायला १ तासच बाकी होता आणि अजून ५० तरी नंबर बाकी होते..कस बर सगळ होणार ह्याच मला कुतूहल निर्माण झाल होत...जिकडे -तिकडे मंदिरात आपण दर्शन घ्यायला आलेल्या  देवाचे सत्काराचे फोटो लावलेले होते..ठिकठिकाणी देवाची दक्षिणा ..फीस पूर्ण द्यावी ह्याची हि पती लावलेली दिसत होती ..जसा जसा माझा नंबर जवळ आला तसं-तसं माझ आत जाऊन दर्शन घेण्याची उत्सुकता वाढू लागली...

माझा नंबर आला .. तेव्हा रेसिप्शन वाल्या बाई ने मला दरवाजा जवळ येऊन उभा राहायला सांगितला...माझ्या आधीचा भक्त जाऊन बाहेर आला आणि मग मी आत गेलो....मी देवाकडे बघणार तोच मला तिथे असलेल्या २ पुजारी (असिस्ट) ह्यांनी मला देवाकडे बघू न देताच स्टूल वर बसायला सांगितला  आणि जशे प्रश्न-उत्तरांचा खेळ खेळतात तशी विचारणा सुरु केली.. मी देवाकडे बघायचा प्रयत्न करत होतो पण ते दोघांनी जो प्रश्न-उत्तराचा तास चालू केला ....तो मला मी श्रद्धेने भेटायला आलेल्या देवाकडे बघूच देयीना...तो पर्यंत देवाने माहित असलेली सगळी औषधे समोरच्या एका व्यक्तीला लिहायला सांगितली..शेवटी मी ज्याला श्रद्धेने भेटायला आलो त्या देवाला विचारलेच ह्या त्रासाचे कारण काय? कशाने होत? तर देव म्हणाला "होईल सगळा ठीक"......
बस एवढा बोलून देव शांत झाला..त्याची आणि माझी नजरा-नजर देखी झाली नाही ..तोवर मला समोर बसलेल्या पुजारी (असिस्ट) बोलली .."बाहेर ४०० रुपये जमा करा..आणि next अशी ओरडली" हे ऐकून मी चकितच झालो.. जसा विठ्ठलाच्या दर्शनाला तुम्ही श्रद्धेने जाता ...आणि तिथे असलेला पुजारी तुमची आणि देवाची नजरा-नजर सुद्धा न होऊ देता तुमचा बक्हाड धरून बाहेर ढकलतो .. अगदी त्याच प्रमाणे मी ज्याला श्रद्धेने माझ गाऱ्हाणं सांगायला आलो त्या देवाची आणि माझी नजरा-नजर न होऊ देता अगदी ५ सेकंदा मध्ये मला बाहेर काढण्यात आलं..
मी बिचारा बाहेर येऊन पैसे देऊन ...औषधे घेऊन आपल्या आपल्या वाटेला लागलो..

असो...देवाने जसा सांगितला होता त्याप्रमाणे १ आठवड्या मध्ये सगळा ठीक पण झाल..पुन्हा भेटायला बोलावलेल्या दिनांकला मला परत त्या देवाकडे जाण्याची इच्छा पण झाली नाही..पण देवाची कृपा दृष्टी झाल्याने सगळा काही ठीक झालं.
आज समाजात बरेच अशे देव आहेत जे रुग्णसेवा म्हणजेच आपला धर्म मानतात ..भगवंत त्यांना शक्ती देवो त्यांच्यामुळेच आज आपण निश्चिंत आहोत.. आणि बरेच काही देव असे आहेत माझा देव बनण्यात झालेला सर्व खर्च लवकरात लवकर कसा भक्तांकडून काढू शकतो ह्यातच आपला धर्म मानतात ..भगवंत त्यांना सद्बुद्धी देवो..
आज हा Dr. नावाचा देव बसलेला आहे म्हणून आपण निश्चिंत पणे जगतो आहे .. कारण मला माहिती आहे मला काहीही झाले तरी माझी काळजी वाहण्यासाठी भगवंत जरी नाही आला तरी Dr. नावाचा देव आज गल्ली गल्ली तल्या मंदिरांमध्ये बसलेला आहे..:)


Tuesday, July 19, 2011

कसं जगावं?

बघितलं  तर ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अवघड आहे . पण माझ्या मते जगावं तर पावसाच्या  थेम्बासारखा..
पाउस बरसत असतो तेव्हा तुम्ही कधी पहिला आहे ...त्याचा थेंब अन थेंब आनंदाने नाचत असतो...आपण कुठे  पडतो आहे ह्याचा त्याला भानही नसतं आणि विचारही नसतो...पण प्रत्येक  थेंब पडताना स्वतःच अस्तित्व  विसरून नाचताना बागडताना दिसतो . :)

तो काळ्या डांबरी रस्त्यावर सुद्धा आनंदाने नाचतो ..आणि furnished vertified tiles वरती सुद्धा नाचताना दिसतो . :) आपण काळ्या गढूळ पाण्यात पडतो आहे कि आणखी कुठे..ह्याचा विचार ते कधीच करत नाही.. ते फक्त  बिनधास्तपणे उडी  मारता आणि मिळालेल्या क्षणाचा आनंदात रुपांतर करता ...

आपलेही तसेच आहे..आपल्या जीवनात येणारा आपला प्रत्येक क्षण पावसाच्या एका-एका थेम्बासारखा  आहे ..आपला येणारा क्षण कुठे जाणार? कसा जाणार? ह्याचा कुणालाच अंदाज नसतो...पण आपण जर त्याचा विचार  न करता बिनधास्तपणे त्या क्षणात  उडी मारली तर आपलं  जीवन  पण आनंदी बनू शकेल...

पावसाकडे बघताना फक्त एकदा हा दृष्टीकोन ठेवून तर बघा ..आपल्याला पाऊसही आवडेल आणि आपलं  आयुष्यही... :)



Wednesday, April 27, 2011

नियती स्विकार..

धुसर झाल्या आशा, धुसर झाल्या दिशा,
धूसर झालीत स्वप्ने ,अन धूसर झालेत विचार..
समोर आहे नियती उभी, कर तू तिचा स्विकार..

बळ दिलेस तू,आणि पंखास दिली नवी उभारी..
आता सांग तयाला त्यानेच कर तू आकाशात प्रसार...
समोर आहे नियती उभी, कर तू तिचा स्विकार..

आयुष्यात सगळेच दिले..नाही केली काही अपेक्षा..
कधी नाही केली कसलीच उपेक्षा,पण आता होत आहे उपेक्षांचाच भडीमार ..
समोर आहे नियती उभी, कर तू तिचा स्विकार..


Saturday, April 16, 2011

आठवण..

हताश मी बसलो होतो ..
मनामनातून खचलो होतो ..
सगळ्या गर्दीत एकटाच हरवलो होतो ..

मनी वाटले तुला पाहावे ..
पाखरांसवे उंच उडावे ..
तुझ्यासोबत पुन्हा जगावे ..

ढगांसंगे गाणे गावे ..
रुतुराजाचे येणे व्हावे..
वसंतात बहरून जावे..

मग अचानक कळले तू आता इथे नाही..

तुझे दिसणेही आता शक्य नाही..

असलेल्या आठवणीना कुरवाळत बसलो.. आणि एकटाच हसलो..

तेव्हा मात्र एकाच कळले..आता एकाच गोष्ट उरली आहे..

जगावे आठवणींच्या गावा ....!! 






Monday, September 27, 2010

माझ्यातला मी ..

आज शनिवार ..Office relax होत.. म्हणजे लेट गेला तरी चालणार होता .. रात्रभरच्या विचाराने मन आणि डोकं जड झालेला होता .. शोवर खाली उभा राहून आयुष्याचा विचार करू लागलो..क्षणात भर भर करत आयुष्य सबंध आयुष्य एखाद्या भरभरणाऱ्या पाखरासारखा उडून गेलं...

पहिला वाढदिवस..शाळेचा पहिला दिवस..निसर्गात मित्रांसोबत
काढलेल्या ट्रिप्स ..केलेला एन्जोय ..पहिला पगार..
पहिला किस.. मित्रांसोबत केलेली मजा..आईला आणि बाबांना पहिल्या पगारातून केलेली shopping ..

सगळा काही एखाद्या movie सरकत जावा तसं डोळ्यासमोर तरळून गेलं..

पण शेवटी एकाच लक्षात आला..ह्या आठवणींमध्ये असलेला मी..आणि आजचा मी ह्यात खूप फरक जाणवला..सध्याचा असलेला "मी"..मीच आहे पण तरीही आजचा मी "तो मी नव्हेच" असा आहे हि भावना मनात घर करून गेली..
लहानपणी चार आणे मिळून खुश असलेला मी आज कितीतरी पट मिळूनही खरच खुश आहे का? काळाचा मी आजचा आयुष्य जगताना बदलला आहे एवढा मात्र खंर..कदाचित मला नक्की काय म्हणायचं आहे हे शब्दात मांडायला जमत नसेल मला .. पण नक्कीच सगळ बदलल आहे .. आज माझ्याकडे सर्व गोष्टी असताना माझ्यातला मी आज मला सापडत नाही आहे ..आणि तो सापडायला आज मला वेळ पण देता येत नाही आहे..

लहानपणी वाटायचे मोठा झाल्यावर मी हे करीन..ते करीन मनात खूप सारया आशा होत्या.. आकांक्षा होत्या.. पण खरच खंर पहिला तर त्यापैकी आज मी काही एक करत नाही आहे..आणि किंबहुना काही करूच शकत नाही आहे ..सगळ्यांसाठी आयुष्य जगताना..सांभाळताना माझ्यातल्या मी ला..मी कुठेतरी दडपून ठेवले आहे ..आयुष्याकडून मिळणारे सुख, दुःख ,frustrations अनुभवताना /त्यांच्याशी झगडताना माझ्यातल्या मी ला जे करावेसे वाटत आहे त्याच्यासाठी माझ्या जवळ वेळच नाही आहे..

प्रत्येक वेळी आयष्य एक वेगळाच वळण घेतं..चांगल असो किवा वाईट ..पण आय्श्याच्या वाटेवर.. प्रत्येक वळणावर मला काहीतरी भेटते मी खुश होतो..पण समजते जे आपल्याला हवे आहे ते हे नाहीच ...विचार करतो.."थांब.....थोडा वेळ थांब..तुझ्या ज्या आयुष्याकडून अपेक्षा आहेत..त्या होतु पूर्ण ".....पण कधी?? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुन्हा धावतो..जगण्याच्या ह्या RAT-RACE मध्ये नुसता धावतोच आहे. किंबहुना ढकलला जातो आहे..धावता धावता ........दमतो..थकतो.."पण कधी??" ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मला मिळालेले नसते..जेव्हा कडेला बघतो . तेव्हा जाणवते आपण फार काही पुढे गेलेलो नाही..पण आपल्या बाजूने दिसणारे ..धावणारे जग भराभरा धावताना दिसते..प्रत्येक वळणावर पुढे काय दिसते ? काय मिळते ? मी हेच पाहत राहतो..तिथे त्या पलीकडे ..ज्याला आपण क्षितीज म्हणतो तिथेच माझ्या मनातले स्वप्ना मला मिळणार आणि मला माझा मी सापडणार..आणि माझी स्वप्न सत्यात उतरतील आणि म्हणून क्षितीज पकडण्यासाठी मी पुन्हा धावायला लागतो..पण मला एकाच विश्वास आहे ..मी क्षितिजाला पार करणारच व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवणारच..

अर्थात मी निराश नक्कीच नाही ..माझ्या आयुष्याबद्दल मला तक्रार तर अजिबात नाही.. मला जे आयुष्याकडून मिळाले ते भरभरून मिळाले, आणि जे मिळत आहे ते भरभरून मिळत आहे..पण माझ्यातला मी कुठेतरी राहून चालला आहे ह्याची हुरहूर मनाशी कुठेतरी आहे..

मी आयुष्याचा अथांग समुद्र अनुभवला..माझ्या पायाशी येणाऱ्या सुखाच्या आणि दुखाच्या लाटा अनुभवल्या ... त्यांचे खडकावरून उडणारे पाण्याचे तुषार अंगावरून झेलले ..आयुष्याचा समुद्रात रंगबेरंगी शंख व शिंपले जमवले...असे खूप सारे शिंपले सापडले ज्यात मला नेहमी साथ देणारे मित्रांसारखे मोती सापडले..ते मोती मी माझ्या हृद्यापाशी जपून ठेवले आहेत..नेहमी साठी देणारा बायको रुपी मोती सापडला..तोही मी जपून ठेवणारच..पण तरीही असा एक शिंपला ज्यात माझ्या स्वप्नांचा मोती दडून बसलेला आहे तो मला काही केल्या मिळताच नाही आहे..

मी शांत असतो पण मनात खोलवर कुठेतरी..scheduled task प्रमाणे प्रश्न आणि उत्तरांचा खेळ चालूच असतो..असा केला तर? हे करून पाहिलं तर? ..तसं करून पाहिलं तर? पण नुसतेच प्रश्न असतात ..आणि त्यांचे पर्याय असतात ..मीच प्रश्नांचा पर्याय निवडतो..आणि मनातला माझा होस्ट मला विचारतो लॉक करू?... मी पुन्हा स्तब्ध होऊन जातो..आणि पर्यायावरून नजर फिरवतो पण eकाही केल्या पर्यायचनिवडता येत नाही ..आणि शेवटी मीच लॉक होऊन जातो ..

मला माझ्या आयुष्याकडून अजून बऱ्याच अपेक्षा आहेत ..व मी पाहिलेले स्वप्न पूर्ण होतीलच .. कारण मी जे काही करू शकतो ते करणारच पण आता सध्या तरी वाहत्या पाण्यात काडी बनून वाहत जाणेच माझ्या हातात आहे..कारण प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हि वेळ नक्कीच नाही...
पोस्ट लिहिता लिहिता लक्षात आलं मी चक्क blog लिहायला लागलो ...असा काही लिहिण्याची अपेक्षा मला कधीच नव्हती..चला अंगावर आनंदाचा आणखी एक थेंब पडला..त्यात चिंब भिजून घेऊया...