Monday, September 27, 2010

माझ्यातला मी ..

आज शनिवार ..Office relax होत.. म्हणजे लेट गेला तरी चालणार होता .. रात्रभरच्या विचाराने मन आणि डोकं जड झालेला होता .. शोवर खाली उभा राहून आयुष्याचा विचार करू लागलो..क्षणात भर भर करत आयुष्य सबंध आयुष्य एखाद्या भरभरणाऱ्या पाखरासारखा उडून गेलं...

पहिला वाढदिवस..शाळेचा पहिला दिवस..निसर्गात मित्रांसोबत
काढलेल्या ट्रिप्स ..केलेला एन्जोय ..पहिला पगार..
पहिला किस.. मित्रांसोबत केलेली मजा..आईला आणि बाबांना पहिल्या पगारातून केलेली shopping ..

सगळा काही एखाद्या movie सरकत जावा तसं डोळ्यासमोर तरळून गेलं..

पण शेवटी एकाच लक्षात आला..ह्या आठवणींमध्ये असलेला मी..आणि आजचा मी ह्यात खूप फरक जाणवला..सध्याचा असलेला "मी"..मीच आहे पण तरीही आजचा मी "तो मी नव्हेच" असा आहे हि भावना मनात घर करून गेली..
लहानपणी चार आणे मिळून खुश असलेला मी आज कितीतरी पट मिळूनही खरच खुश आहे का? काळाचा मी आजचा आयुष्य जगताना बदलला आहे एवढा मात्र खंर..कदाचित मला नक्की काय म्हणायचं आहे हे शब्दात मांडायला जमत नसेल मला .. पण नक्कीच सगळ बदलल आहे .. आज माझ्याकडे सर्व गोष्टी असताना माझ्यातला मी आज मला सापडत नाही आहे ..आणि तो सापडायला आज मला वेळ पण देता येत नाही आहे..

लहानपणी वाटायचे मोठा झाल्यावर मी हे करीन..ते करीन मनात खूप सारया आशा होत्या.. आकांक्षा होत्या.. पण खरच खंर पहिला तर त्यापैकी आज मी काही एक करत नाही आहे..आणि किंबहुना काही करूच शकत नाही आहे ..सगळ्यांसाठी आयुष्य जगताना..सांभाळताना माझ्यातल्या मी ला..मी कुठेतरी दडपून ठेवले आहे ..आयुष्याकडून मिळणारे सुख, दुःख ,frustrations अनुभवताना /त्यांच्याशी झगडताना माझ्यातल्या मी ला जे करावेसे वाटत आहे त्याच्यासाठी माझ्या जवळ वेळच नाही आहे..

प्रत्येक वेळी आयष्य एक वेगळाच वळण घेतं..चांगल असो किवा वाईट ..पण आय्श्याच्या वाटेवर.. प्रत्येक वळणावर मला काहीतरी भेटते मी खुश होतो..पण समजते जे आपल्याला हवे आहे ते हे नाहीच ...विचार करतो.."थांब.....थोडा वेळ थांब..तुझ्या ज्या आयुष्याकडून अपेक्षा आहेत..त्या होतु पूर्ण ".....पण कधी?? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुन्हा धावतो..जगण्याच्या ह्या RAT-RACE मध्ये नुसता धावतोच आहे. किंबहुना ढकलला जातो आहे..धावता धावता ........दमतो..थकतो.."पण कधी??" ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मला मिळालेले नसते..जेव्हा कडेला बघतो . तेव्हा जाणवते आपण फार काही पुढे गेलेलो नाही..पण आपल्या बाजूने दिसणारे ..धावणारे जग भराभरा धावताना दिसते..प्रत्येक वळणावर पुढे काय दिसते ? काय मिळते ? मी हेच पाहत राहतो..तिथे त्या पलीकडे ..ज्याला आपण क्षितीज म्हणतो तिथेच माझ्या मनातले स्वप्ना मला मिळणार आणि मला माझा मी सापडणार..आणि माझी स्वप्न सत्यात उतरतील आणि म्हणून क्षितीज पकडण्यासाठी मी पुन्हा धावायला लागतो..पण मला एकाच विश्वास आहे ..मी क्षितिजाला पार करणारच व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवणारच..

अर्थात मी निराश नक्कीच नाही ..माझ्या आयुष्याबद्दल मला तक्रार तर अजिबात नाही.. मला जे आयुष्याकडून मिळाले ते भरभरून मिळाले, आणि जे मिळत आहे ते भरभरून मिळत आहे..पण माझ्यातला मी कुठेतरी राहून चालला आहे ह्याची हुरहूर मनाशी कुठेतरी आहे..

मी आयुष्याचा अथांग समुद्र अनुभवला..माझ्या पायाशी येणाऱ्या सुखाच्या आणि दुखाच्या लाटा अनुभवल्या ... त्यांचे खडकावरून उडणारे पाण्याचे तुषार अंगावरून झेलले ..आयुष्याचा समुद्रात रंगबेरंगी शंख व शिंपले जमवले...असे खूप सारे शिंपले सापडले ज्यात मला नेहमी साथ देणारे मित्रांसारखे मोती सापडले..ते मोती मी माझ्या हृद्यापाशी जपून ठेवले आहेत..नेहमी साठी देणारा बायको रुपी मोती सापडला..तोही मी जपून ठेवणारच..पण तरीही असा एक शिंपला ज्यात माझ्या स्वप्नांचा मोती दडून बसलेला आहे तो मला काही केल्या मिळताच नाही आहे..

मी शांत असतो पण मनात खोलवर कुठेतरी..scheduled task प्रमाणे प्रश्न आणि उत्तरांचा खेळ चालूच असतो..असा केला तर? हे करून पाहिलं तर? ..तसं करून पाहिलं तर? पण नुसतेच प्रश्न असतात ..आणि त्यांचे पर्याय असतात ..मीच प्रश्नांचा पर्याय निवडतो..आणि मनातला माझा होस्ट मला विचारतो लॉक करू?... मी पुन्हा स्तब्ध होऊन जातो..आणि पर्यायावरून नजर फिरवतो पण eकाही केल्या पर्यायचनिवडता येत नाही ..आणि शेवटी मीच लॉक होऊन जातो ..

मला माझ्या आयुष्याकडून अजून बऱ्याच अपेक्षा आहेत ..व मी पाहिलेले स्वप्न पूर्ण होतीलच .. कारण मी जे काही करू शकतो ते करणारच पण आता सध्या तरी वाहत्या पाण्यात काडी बनून वाहत जाणेच माझ्या हातात आहे..कारण प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हि वेळ नक्कीच नाही...
पोस्ट लिहिता लिहिता लक्षात आलं मी चक्क blog लिहायला लागलो ...असा काही लिहिण्याची अपेक्षा मला कधीच नव्हती..चला अंगावर आनंदाचा आणखी एक थेंब पडला..त्यात चिंब भिजून घेऊया...