Wednesday, August 4, 2010

आरंभ..

आकाशात काळे ढग जमायला लागले कि का कुणास ठाऊक माझ्या मनात अनामिक अशी एक भीती आणि हुरहूर निर्माण होऊन जाते..माझं हे असाच असत हुरहूर कशाची आणि भीती कशामुळे मला आजपर्यंत कधीच समजलेलं नाही... असो..
काळे ढग येतात ..सोसाट्याचा वारा सुटतो ..विजा कडाडता ..सुरुवातीचे चार थेंब पडतात .. आणि मातीचा सुगंध दरवळायला लागतो..पण चार थेंब टाकून ढग तसेच निघून जातात..आणि आपण त्या ढगांकडे सुक्या सुक्या नजरेने बघत राहतो.. कोरडेच ढग ते त्यांना ओलावा काय कळणार..

माझं सुद्धा असच होत, मनात विचारांचा वारा सोसाट्याने वाहू लागतो .. कोरड्या विचारांच्याच विजा कडकडायला लागतात ..आणि मनात एक अनामिक आशी भीती आणि हुरहूर निर्माण करून जातात..अस का होत?? आज पर्यंत मला कधीही समजलेला नाही...

आज मात्र पाऊस बेभान होऊन बरसतो आहे ..फुला पानांवर थेंब होऊन पसरतो आहे ..काळ्या डांबरी रस्त्यावर थयथयाट करून नाचतो आहे..ओढ्या नाल्यांमध्ये अवखळ पणे वाहतो आहे..
पावसाला पाहून आज मी हि ठरवलं आज आपण हि बरसायचं ..लिहिलेले शब्द थेंबा थेंबा ने वाढवायचे आणि त्यांचा ओढ्यात झालेला रुपांतर बघत राहायचा ..मनाच्या पडद्याला थोडा वेळ बंद करून जे काही सूर निघतील त्यांना कागदावर उतरावयाच..
कालचे कोरडे ढग आज ओले झाले आणि स्वताच्या उमेदीवर बरसून सर्व वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करून गेले ..
काळ परवापर्यंत पावसाचं काहीच अस्तित्व नव्हत आणि आज सगळीकडे फक्त तो आणि तोच आहे.. माझ्याही आयुष्यात असाच काही आहे..काल माझं काहीच अस्तित्व नव्हतं, आज सुद्धा अगदी ते नावालाच आहे पण असं जरी असलं तरी उद्याच्या दिवसावर फक्त माझंच नाव कोरायचंय.. ह्याला फक्त तुझी आणि फक्त तुझीच साथ हवी आहे...
समोरचा तो डोंगरमाथा काल उघडाबंब होता, आज मात्र पावसाच्या अस्तित्वाने तो स्वताचं हिरवं रुपडं सगळ्या जगाला नटवून सांगत फिरतोय...माझाही अस्तित्व कुणीतरी नवलाईने नटवून कुणालातरी सांगेल ह्याची मला खात्री आहे....

तळपणारया सुर्याला झेलताना धरणी फाटली तरी पावसाची वाट पाहताना ती कधी थकत नाही, ढग इथे येतात तेव्हा ते कधी हजारो मैलांचा विचार करत नाही, वाहणारी नदी कधी समोरच्या अडथळ्यांना घाबरत नाही, मग मी कशाला कुणाला घाबरू ?

पण मला फक्त तू आणि तूच सगळ्या परिस्थितीत साथ दे ..कारण हे तुझ्या शक्तीशिवाय कधी हि शक्य होणार नाही .......देवा, ऐक्तोयेस ना रे तू???















8 comments:

Geeta said...

Its Amazing Yaar..tu khup chan lihitos.....

TJ said...

Nice layout!

Unknown said...

Kya baat, Kya baat, Kya baat....
Kay o lagnacha effect ahe ka ha?
Btw chhan lihil aahes ekdam.

iyogesh said...

sahii....good one pan achanak kas kay..kavita pan n blog pan?? :)

Vaishali said...

Hey..nice post..aarambh ekdum shubharambh aahe.. btw kavita kuthe aahe?

Unknown said...

good bahutek mazya poranna shalet tu lihilele dhade vachave lagtil

roopali said...

Faar chan lihiles aahe, keep it up..

Sukhada said...

Khupach sundar lihitos re tu !!!
He article wachun ase watle... so simple.... yet so complicated :)

Asach lihit raha :)