मैत्री ......रक्ताच्या नात्यानंतर आयुष्यातला सगळ्यात सुंदर नांत.. आई बाबा आजी आजोबा आणि मामा ह्यांच्यानंतर किंवा कधी कधी ह्यांच्या आधी जो कुणी असेल आणि सगळ्यात जवळचा आणि सगळ्याच कडू गोड आठवणीत आणि अनुभवात साथ देणारा म्हणजे "मित्र"..
आयुष्यात जेव्हापासून मैत्री काय असते समाजत पण नव्हते तेव्हापासून असे काही मित्र जोडले गेले आहेत त्यांच्यामुळे आयुष्य खूप सुंदर बनलेले आहे..खरा मित्र कोण जो केव्हाहि हाक मारली तर कामाशिवाय आणि स्वार्थाशिवाय हाकेला "ओ" देणारा ..जो केवळ "जो तेरा हे वह मेरा हे" ह्यात धन्यता मानणारा नसतो तर "जो तेरा हे वह तेरा हे और जो मेरा हे वह भी तेरा हि हे " असा ठणकावून सांगणारा असतो ..
मैत्रीचा धागा इतका घट्ट असतो कि तो स्थळ, काळ,वेळ ह्याचा कधीही भान तो ठेवत नाही आणि कुठल हि संकट आला तरी तो तुटत नाही..ह्या धाग्याला जर आयष्यात योग्य प्रकारे गुंफल तर त्यातून सुंदर नाक्षिरूपी आयुष्य तयार होते ..त्यातला एक एक धागा सुंदर आणि स्वतःच अस्तित्व दाखविणारा आणि एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेला असतो ..
ह्या मैत्रीला कुठलाही बंधन नसत .. न वयाचं.. न स्त्री-पुरुष भेदाच..मैत्री हि कोणामध्ये हि होऊ शकते..आणि कुठ्ल्याहि वयात होऊ शकते .. माझ्या शेजारी राहणाऱ्या आजोबांना -काकांनाही मी मित्र बनवू शकतो आणि माझे विचार त्यांच्याशी शेअर करू शकतो ..
खरा मित्र कोण जो आयुष्यातल्या माझ्या चांगल्या निर्णयाच समर्थन करेल व त्या मागे खंबीर पणे उभा राहील आणि आईच्या नात्याने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करेल पण जर मी आयष्यात काही चुकीचा केल किंवा करत असेल तर बाबांच्या अधिकाराने आणि धाकाने त्या चुकीपासून परावृत्त करेल .. एवढी ताकद खरया मैत्रीमध्ये असते.. :)
खरी मैत्री हि सतत साथ देणारी असते ती स्थल-काल परत्वे बदलणारी नसते ..
खरी मैत्री कशी तर कृष्ण - अर्जुना सारखी - जिथे प्रत्येक श्वासात मित्राचच नाव असत.. :)
खरी मैत्री कशी तर कृष्ण - सुदामा सारखी-जिथे प्रेमाने आणलेले पोहे सुद्धा अमृता सारखे लागतात .
खरी मैत्री कशी तर राम - सुग्रीवा सारखी-जिथे मित्रासाठी सारे ऐश्वर्य आणि सेना पणाला लावली जाते.
मित्र हे आयुष्याच्या संध्याकाळी बसलेले असताना आयुष्याकडे बघितले तर आयुष्यात चालताना मिळालेले सुंदर रत्न असतात .. जे शेवट पर्यंत टिकतात ते आयुष्याला एक सुंदर झळाळी आणतात .. :)

No comments:
Post a Comment